जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच आठवडा बाजार न भरविण्याचे आदेश दिले असताना जतमध्ये मंगळवारी आठवडा बाजार भरला. मागील आठवड्यात उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माडग्याळ येथील बाजार बंद केला होता. तसेच जत पोलिसांनी डफळापूर येथे भरलेला बाजार बंद करण्यास सांगितले होते. मग जत येथील बाजाराबाबत जत नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
जत बाजारपेठेला मंगळवारी एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र लोकांची गर्दीच होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनाही सुरू ठेवल्याने सर्वच दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. बुधवारी बकरी ईद व गुरुवारी महाराष्ट्रीय बेंदूर असल्याने मंगळवारी लाेक खरेदीसाठी बाहेर पडले हाेते. बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसत होता. जत नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे गायबच होते.
200721\img-20210720-wa0070.jpg
कडक निर्बंध असतानाही जत शहरात आठवडी बाजार भरला
पोलीस व नगरपरिषदेचे दुर्लक्