शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

न्यायाधीशांसमोर विवाहितेचा स्वत:च्या गळ्याला चाकू

By admin | Published: January 31, 2017 11:58 PM

सांगलीतील घटना; न्यायव्यवस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप

सांगली : पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या मंगरुळ-चिंचणी (ता. खानापूर) येथील स्वाती महेश शिंदे (वय २६) या विवाहितेने चक्क न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या गळ्याला चाकू लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायाधीश, कर्मचारी व पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला. सांगलीत पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. न्यायालयात स्वाती शिंदे हिने पर्समधील चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला व न्यायाधीशांना आत्महत्येची धमकी दिली. ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्यायप्रक्रियेवर माझा विश्वास नाही’, असा आरोपही तिने केला. न्यायालयाने तिला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न, न्यायालयाच्या कामात व्यत्यय व न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिस शिपाई सुप्रिया शेडबाळे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित स्वाती शिंदे हिला रात्रीच अटक करून काही तासानंतर जामिनावर सोडण्यात आले.साळशिंगे (ता. खानापूर) येथील दुर्योधन जाधव यांची मुलगी स्वाती हिचा डिसेंबर २०१४ मध्ये मंगरुळ (चिंचणी)मधील महेश शिंदे यांच्याशी विवाह झाला आहे. तिचा पती महेश आॅस्ट्रेलिया येथे खासगी कंपनीत नोकरी करतो. विवाहानंतर दीड-दोन महिने स्वाती सासरी होती. त्यानंतर कौटुंबिक कारणावरुन मतभेद निर्माण झाल्याने ती माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी मध्यस्थी करून मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वातीने सासरी जाण्यास नकार दिला. आॅगस्ट २०१६ मध्ये तिने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सांगलीतील पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन-तीन वेळा सुनावणी झाली. न्यायालयाने महेश व स्वाती या दाम्पत्यास समझोता करण्यास वेळ दिला होता. तरीही त्यांच्यातील भांडण न मिटल्याने समझोता झालाच नाही. स्वातीने सासरी जाण्यास न्यायालयाला स्पष्टपणे नकार देऊन घटस्फोटाचा निर्णय देण्याची मागणी केली होती. सोमवारी (दि. ३० जानेवारी) घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम सुनावणी होती. त्यामुळे स्वाती व महेश यांचे नातेवाईक सकाळपासून न्यायालयाच्या आवारात बसून होते. दुपारी प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज निकाली काढलयानंतर महेश व स्वातीचे नातेवाईक न्यायालयातून बाहेर पडले. महेशचे नातेवाईक मंगरुळला (चिंचणी) जाण्यासाठी तेथून निघालेही होते. त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता स्वाती अचानक पुन्हा न्यायालयात गेली. न्यायालयात दुसऱ्या खटल्याचे कामकाज सुरू होते. स्वातीने न्यायालयास ‘मी पतीसोबत नांदायला तयार आहे’, असे सांगितले. यावर न्यायालयाने शिपायास तिच्या पतीला बोलावून आणण्यास सांगितले, पण पती व त्याचे घरचे निघून गेले होते. त्यामुळे स्वातीने अचानक पर्समधील चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला. ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास नाही’, असा आरोप करून आत्महत्येची धमकी दिली. या प्रकारामुळे न्यायालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)पोलिस, कर्मचाऱ्यांची धावपळस्वातीने पर्समधील चाकू काढून चक्क न्यायाधीशांसमोर स्वत:च्या गळ्याला लावून आत्महत्येची धमकी दिल्याने न्यायालयातील कर्मचारी, शिपाई व पोलिसांची तारांबळ उडाली. तिला बोलण्यात गुंतवून महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडील चाकू काढून घेतला. तिला ताब्यात घेण्यात आले. तिला शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. तिला जामिनावर सोडण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच तिला जामिनावर सोडले