लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ‘वाॅच’ ठेवण्यासाठी स्पेशल मार्शल कमांडो फोर्स तैनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत, भिलवडी व आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्यावतीने गुरुवार, दि. २२ ते २५ जुलैअखेर गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिलवडीमधील व्यापारी संघटनेने सर्व अत्यावशक सेवा देणारी दुकानेही बंद ठेवून सहकार्य केले आहे. नेहमी गजबजलेल्या भिलवडी बाजारपेठेत गुरुवारी पूर्णपणे शुकशुकाट होता. दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी घरी बसणेच पसंत गेले. कमांडो फोर्स गावात फिरून विनाकारण गर्दी करणाऱ्या, विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. या पथकामध्ये पाच पुरुष व एका महिला कमांडोचा समावेश आहे.
220721\img-20210722-wa0406.jpg
भिलवडी येथे गर्दी वर नियंत्रण करण्यासाठी स्पेशल फोर्स कमांडो पथक नेमण्यात आले.