शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

धारावीत एटीएम कॅश व्हॅन लुटणारे भुर्इंजमध्ये जेरबंद

By admin | Published: March 17, 2017 11:27 PM

आनेवाडी टोलनाक्यावर थरार : पंधरा लाख चाळीस हजारांची रोख रक्कम जप्त; एका महिलेसह तीन संशयित मुंबई पोलिसांकडे वर्ग

सातारा/कवठे : मुंबईच्या धारावी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेच्या एटीएम कॅश व्हॅनमधील पैशांची पेटी लुटली गेल्यानंतर राज्यातील पोलिस खाते सतर्क बनले होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर खासगी ट्रॅव्हल्समधील पाच संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडून जवळपास पंधरा लाख चाळीस हजार रुपये इतकी रोख रक्कमही ताब्यात घेतली.मुंबईत व्हॅन लुटल्यानंतर काही संशयित मुंबईतून कर्नाटककडे पसार झाल्याची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांनी सातारा जिल्हा पोलिस दलाला अलर्ट केले. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या सहकाऱ्यांनी आनेवाडी टोलनाक्यावर सापळा रचला. मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवासी वाहनाची कसून तपासणी सुरू केली. दरम्यान, मुंबईतील घटनेची माहिती अशी की, सुरक्षेअभावी लुटारूंनी लुटल्याची खळबळ जनक घटना धारावीत गुरुवारी दुपारी घडली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारूंचा प्रताप कैद झाला असून, पोलिसांच्या तपास पथकांसह गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत आहेत. यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयाची लूट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धारावी येथील ओएनजीसी बिल्डिंग जंक्शनवरील एसबीआयच्या एटीएम परिसरात ही घटना घडली. गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास बँकेची कॅश व्हॅन एटीएम सेंटरच्या समोरील रस्त्यावर थांबली. व्हॅनमधील तीन कर्मचारी छोट्या बॅगेत पैसे घेऊन एटीएममध्ये भरण्यासाठी पुढे आले. यावेळी चालक एकटाच व्हॅनमध्ये होता. दुपारी तीनच्या सुमारास टोळीतील एका लुटारूने चालकाला बोलण्यात गुंतवले. तर त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी कर्मचारी बाहेर येईपर्यंत व्हॅनमधून शिताफिने पैशांची पेटी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस आयुक्त आर. डी. शिंदे, पोलिस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्यासह धारावीचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत बांगर घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारूंचा प्रताप कैद झाला आहे. यामध्ये दोन तरुण पैशांची पेटी घेऊन पुढे टी जंक्शनकडे जाताना दिसत आहेत. यामध्ये तब्बल चार ते पाचजणांचा समावेश असल्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे. (प्रतिनिधी) मुंबई-बेंगलोर बसमध्ये सापडली रक्कमशुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका मुंबई-बेंगलोर खासगी प्रवाशी बसमध्ये पोलिसांना एका महिलेसह तीन संशयित आढळले. त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे तब्बल पंधरा लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या संशयितांची अधिक चौकशी करुन संबंधितांना धारावी पोलिसांच्या स्वाधीन केले.