शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

तुती लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 2:14 PM

तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.

ठळक मुद्दे तुती लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : डॉ. अभिजीत चौधरी21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान

सांगली : तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.

पात्र शेतकऱ्यांना 1 एकर तुती लागवडी करीता 500 रूपये नोंदणी फी भरून आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.महारेशीम अभियान-2020 चा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्याऱ्या चित्ररथास जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रकाश पाटील, तांत्रिक कर्मचारी सुनिल पाटील, तानाजी गावडे, शिवाजी खडसरे, मयुर पाटील, तौफिक मुलाणी, सुरेश थोरात, जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत निवड केलेले शेतकरी उपस्थित होते.रेशीम उद्योग हा शेती आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करून त्या शेतात केलेल्या कामकाजाचा रोजंदारी मेहनताना शासनाकडून मनरेगाच्या नियमानुसार साप्ताहिक मजुरी तीन वर्षाकरीता दिली जात आहे. सदरचे कामकाज शासनाने ठरवून दिलेल्या मनरेगाच्या निकषानुसार परिपूर्ण करणे गरजेचे आहे.

यामध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पादीत होणाऱ्या कोषापासून होणारे उत्पन्न त्या लाभार्थीस दुहेरी लाभ दिला जात आहे. म्हणजे स्वत:च्या शेतामध्ये कामकाज करून शासनाच्या वतीने रेशीम शेतीशी निगडीत केलेल्या कामकाजाची मजुरी नियमित अदा केली जात आहे. लाभार्थीस शासन नियमानुसार तीन वर्षा करीता साप्ताहिक मजुरी 682 दिवस व 213 दिवस किटक संगोपन गृह बांधकामाच्या कालावधीमध्ये मजुरी अदा केली जाणार आहे. तसेच रेशीम पिकासाठी लागणारे संगापन गृहासाठी कुशल खर्च 1 लाख 10 हजार 780 रूपये नियमानुसार दिला जाणार आहे. या करीता जादा लागणारा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थीस स्वत: करावा लागणार आहे.रेशीम उद्योग योजनेमध्ये मनरेगा अंतर्गत पहिल्या वर्षी मजुरी अकुशल 1 लाख 1 हजार 970 रूपये, सामुग्री अकुशल 81 हजार 210 रूपये असे एकूण 1 लाख 83 हजार 180 रूपये, दुसऱ्या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रूपये, सामुग्री अकुशल 19 हजार 285 रूपये असे एकूण 60 हजार 485 रूपये, तिसऱ्या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रूपये, सामुग्री अकुशल 10 हजार 285 रूपये असे एकूण 51 हजार 485 रूपये. याप्रमाणे तीन वर्षात मजुरी अकुशल 1 लाख 84 हजार 370 रूपये, सामुग्री अकुशल 1 लाख 10 हजार 780 रूपये असे एकूण 2 लाख 95 हजार 150 रूपये शासकीय अनुदानाचा लाभ आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली