शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महापौरांच्या राजीनाम्याचे घोडे अडल

By admin | Published: January 07, 2015 11:05 PM

पुढील आठवड्यात सभा : सांगली-मिरजेतील नगरसेवकांत उत्सुकतो

सांगली : महापौर कांचन कांबळे यांच्या राजीनाम्याविषयी महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा असून, जानेवारी महिन्याच्या महासभेत त्यांचा राजीनामा होणार का? याची उत्सुकता सत्ताधारी नगरसेवकांसह इच्छुकांना लागली आहे. त्यात कांबळे यांना अद्याप सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी राजीनामा देण्याविषयी आदेश दिले नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेत सध्या महापौर कांचन कांबळे यांच्या राजीनाम्याचीच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर बदल करण्याचा निर्णय मदन पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार काही ज्येष्ठ नगरसेवकांना त्यांनी शब्दही दिला होता. निवडणुकीतील पराभवानंतर मदन पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीतही महापौर बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतरही गेले दोन महिने महापौरांच्या राजीनाम्याचे घोडे अडले आहे. नव्या वर्षात महापौरांचा राजीनामा होईल, असा दावा इच्छुकांनी केला आहे. कांबळे यांनी महिन्याभराची मुदतवाढ मागितल्याचे समजते. आता ती मुदतही संपली आहे. त्यांच्या राजीनाम्याचा फार गाजावाजा होऊ नये, यासाठीच सत्ताधारी गटाने डिसेंबर महिन्यात महासभाच घेतली नाही. त्यामुळे इच्छुक नगरसेवक धास्तावले होते. गटनेते किशोर जामदार यांना महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांची समजूत काढण्याची वेळ आली होती. जानेवारी महिन्याच्या महासभेत कांबळे यांचा राजीनामा होईल, असे सांगितले जात असतानाच, पुन्हा एकदा त्याला फाटे फुटू लागल्याची चर्चा आहे. महापौरांना राजीनामा देण्याचे आदेश मदनभाऊंनी दिले नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. जोपर्यंत मदनभाऊंचा आदेश येत नाही, तोवर राजीनाम्यावर चर्चा नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. विकास महाआघाडीच्या काळात इद्रिस नायकवडी यांनी आ. जयंत पाटील यांच्याविरोधात बंड करून अडीच वर्षे महापौरपदाचा लाभ घेतला होता. हा अनुभव ताजा असल्यानेच सत्ताधारी काँग्रेसची नेतेमंडळी महापौर कांबळे यांच्या राजीनाम्याविषयी सावध पावले उचलत आहेत. येत्या १९ जानेवारी रोजी नव्या वर्षातील पहिली महासभा होणार आहे. या सभेत महापौरांचा राजीनामा होईल, असा दावा इच्छुक मंडळी करू लागली आहे. त्यामुळे विद्यमान महापौरांचा राजीनामा होणार की त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार, याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली आहे. (प्रतिनिधी)इच्छुक गॅसवरमहापौरपदासाठी सध्या विवेक कांबळे, बसवेश्वर सातपुते इच्छुक आहेत. त्यात विवेक कांबळे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून कांबळे यांनी महासभा घेण्यासाठी गटनेत्यांकडे तगादा लावला होता. गटनेत्यांनीही त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आता महापौरांचा राजीनामा होणार की नाही, याची धास्ती लागल्याने इच्छुक गॅसवर आहेत.