महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी नगरसेवकांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी बैठक होणार आहे. वारणा उद्भव योजना दिवंगत मदनभाऊ पाटील यांचे स्वप्न होते. काँग्रेसची सत्ता असताना निधी मंजूर झाला होता. मात्र काँग्रेस सत्तेतून पायउतार झाल्यानंतर योजनेत बदल करण्यात आला होता. आता पुन्हा या योजनेसाठी जयश्रीताई पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यावर बैठकीत चर्चा होईल.
पावसामुळे गुंठेवारी भाग व उपनगरात दैना उडाली आहे. नगरसेवक मुरूमाची मागणी करत आहेत. श्यामरावनगर येथील पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. सांगली व मिरजेतील ड्रेनेज योजनेसंदर्भातही तक्रारी आहेत. यावर चर्चा होणार आहे.
या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान उपस्थित राहणार आहेत.