शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

महापालिकेच्या निधीसाठी लवकरच बैठक

By admin | Published: March 02, 2016 11:27 PM

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील आढावा बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय

सांगली : महापालिकेच्या विविध प्रश्नांवर लवकरच मुंबई व सांगली अशा दोन्ही ठिकाणी बैठका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. पुढील महिन्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीत आढावा घेणार आहेत. त्यानंतर विकास निधीबाबत मुंबईत बैठक होईल, असे उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उपमहापौर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक शेखर माने, अनिलभाऊ कुलकर्णी, भाजपच्या नीता केळकर उपस्थित होते. महापालिकेकडे शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्याधिकारी, मुख्य लेखापरीक्षक अशी १९ पदे रिक्त आहेत. या पदाचा कार्यभार पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकारी नसल्याने पालिकेच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या योजना मार्गी लावण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एलबीटी रद्द झाल्याने पालिकेची आर्थिक स्थिती संकटात आहे. त्यासाठी महापालिकेला विशेष अनुदान देऊन सहकार्य करावे, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. याबाबत पालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही भेट घेतली. त्यांनी पुढील दौऱ्यात पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)काळ्या खणीबाबत पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणारमहापालिकेने काळी खण सुशोभिकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ही बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाबाबत लवकरच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.