शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

सांगलीच्या कन्येकडे कॅनडाच्या ओंटारियोत अन्न सुरक्षेची जबाबदारी, पहिल्यांदा नाकारला होता व्हिसा 

By श्रीनिवास नागे | Published: June 19, 2023 3:37 PM

कॅनडात काहीसा वर्णभेद असल्याने आपल्याला त्या देशाने व्हिसा नाकारल्याची सल तिच्या मनात होती

कुंडल : रामानंदनगर (ता. पलूस) येथील मेघा वाईंगडे-शिंदे हिने कॅनडामधील ओंटारियो प्रांताच्या कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयात अन्न सुरक्षा निरीक्षकपदी नुकताच पदभार स्वीकारला. लग्नानंतर काहीतरी नवीन करण्याच्या जिद्दीने, कोणत्याही खर्चिक शिक्षणाशिवाय तिने घेतलेली भरारी वाखाणण्याजोगी ठरली आहे.रामानंदनगर येथील विजय वाईंगडे यांची मोठी मुलगी मेघाचे बारावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्कर विद्यालयात झाले. तिने कोल्हापूर येथील सायबर महाविद्यालयातून फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुण्यातील प्रयोगशाळेत सहा महिने अन्नाच्या नमुन्यांच्या तपासणीचे प्रशिक्षण घेतले. त्याच दरम्यान तिचे लग्न कोल्हापूर येथील रोहन शिंदे यांच्याशी झाले.पती रोहन मुंबईतील कंपनीत कार्यरत होते; त्याच काळात मेघा तेथील जिममध्ये आहारतज्ज्ञ म्हणून काम करू लागली. सहा महिन्यांनंतर रोहनला कॅनडातील कंपनीत नोकरी मिळाली. मेघाचे शिक्षण अपूर्ण असल्याने तिला कॅनडाला जाणे शक्य नव्हते. पुढे तिने शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तेथील सरकारने व्हिसा नाकारला. यादरम्यान ती कॅनडाची भाषा शिकत तेथील नोकरीच्या शोधात होती. एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर तिला एका कंपनीत नोकरी आणि कामाचा परवानाही मिळाला.कॅनडात काहीसा वर्णभेद असल्याने आपल्याला त्या देशाने व्हिसा नाकारल्याची सल तिच्या मनात होती. त्यामुळे खासगी नोकरीवर समाधान न मानता तिने काही कोर्सेस करून कॅनडातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. त्यात यश मिळवत ती ५ जून रोजी कॅनडा सरकारच्या अन्न सुरक्षा निरीक्षकपदी रुजू झाली. कोणत्याही तांत्रिक, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी पदवीशिवाय, फूड टेक्नॉलॉजीमधूनही परदेशात उच्च पद मिळू शकते, हे तिने दाखवून दिले.

‘पानकंद’चे घेणार पेटंटकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात असताना मेघाने मगई आणि कलकत्ता पानाच्या टाकाऊ देठांपासून गुलकंदासारखा ‘पानकंद’ हा पदार्थ बनवला. त्यामुळे पानाच्या देठांचाही उपयोग होऊ लागला. त्याला लवकरच पेटंटही मिळेल.

कोणतेही काम लहान नसते. जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. परिस्थिती कोणत्याही यशाच्या आड येत नाही. -मेघा वाईंगडे-शिंदे.

टॅग्स :SangliसांगलीCanadaकॅनडा