शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

By admin | Published: May 09, 2017 1:16 AM

आबांच्या स्मारकाचे काम पीडब्ल्यूडीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगलीतील स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले २ कोटी ८७ लाख रुपये वर्ग करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिले. सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृहाच्या आवारात आर. आर. आबांचे स्मारक होणार आहे. अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. जिल्हा परिषदेकडे यासाठी २ कोटी ८७ लाख रुपये आले आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. जे. साळुंखे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. वास्तुविशारद नेमण्यापासून निविदा प्रक्रियेपर्यंतच्या कोणत्याही प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे काम नेमके करायचे कोण, याबाबत संभ्रम होता. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, हे काम नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावे लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा. निधी वर्ग झाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी गतीने काम करावे, अशी सूचना त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत होकार दर्शविला. स्मारकाची उभारणी करताना वसतिगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीचा विषयही उपस्थित झाला. वसतिगृहाचीही दुरवस्था झाली आहे. स्वच्छता आणि सेवा-सुविधांचा अभाव असून, इमारतीच्या दुरुस्तीचीही गरज असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. स्मारकाचे काम सुरू होत असताना, जिल्हा परिषदेने त्यांच्या निधीतून वसतिगृहाची इमारत दुरुस्त करून सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृहाची इमारतही स्मारकाला साजेशी व्हावी, असे ते म्हणाले. आबांच्या खोलीबाहेर माहितीफलकवसतिगृहात ज्या खोलीत आर. आर. आबांनी वास्तव्य केले, त्या खोलीबाहेर त्यांचा माहितीफलक लावण्याचा निर्णयही यापूर्वी झाला आहे. वसतिगृहाची इमारत सुधारण्यात आल्यानंतर आबांच्या खोलीबाहेर फलक लावण्यात येणार आहे. निधी टप्प्या-टप्प्याने मिळणारसध्या प्राप्त झालेला २ कोटी ८७ लाखांचा निधी खर्च केल्यानंतर राज्य शासनाकडून टप्प्या-टप्प्याने स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधी प्राप्त होणार आहे.