शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

म्हैसाळ गटामध्ये बेरजेचे राजकारण सुरू

By admin | Published: January 03, 2017 11:36 PM

स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा : मोर्चेबांधणीला वेग; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच अंतिम निर्णय

सुशांत घोरपडे ल्ल म्हैसाळजिल्हा परिषद निवडणुकीसाठी मिरज तालुक्यातील म्हैसाळ गटात बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. हौसे, नवसे, गवसे यांनी मोर्चेबांधणी करत उमेदवारी मिळविण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. म्हैसाळ जिल्हा परिषद गटाची पुनर्रचना झाल्याने येथील स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. पूर्वीच्या बेडग जिल्हा परिषद गटातील विजयनगर व बेडग ही गावे वगळून म्हैसाळ स्वतंत्र मतदारसंघ करण्यात आला आहे. म्हैसाळ गट ओबीसी गटातील महिलांसाठी आरक्षित आहे, तर म्हैसाळ पंचायत समिती गण खुला झाला आहे. टाकळी पंचायत समिती गणात ओबीसी पुरुष आरक्षण आहे. म्हैसाळ गटात म्हैसाळ, वड्डी, टाकळी, बोलवाड या गावांचा समावेश होतो. म्हैसाळ पंचायत समिती गणात म्हैसाळ हे एकच गाव आहे, तर टाकळी पंचायत समिती गणात वड्डी, बोलवाड या गावांचा समावेश करण्यात आला आहे. म्हैसाळ गटातून अश्विनी कबुरे, जयश्री कबुरे, प्राजक्ता कोरे, आलम बुबनाळे इच्छुक असून त्यांनी आतापासूनच मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या गटात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. म्हैसाळ हे गाव मोठे असल्याने सर्व पक्षांना येथील स्थानिक उमेदवार द्यावा लागणार आहे. या गटात राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती अलकादेवी शिंदे-म्हैसाळकर व भाजपचे नेते दीपक शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. टाकळी व बोलवाड येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा स्वतंत्र गट आहे. म्हैसाळ ग्रामपंचायतीवर मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची एकहाती सत्ता आहे. सहकारी सोसायटी, पतसंस्था यावरही त्यांचा गट कार्यरत आहे. श्रीमती अलकादेवी शिंदे-म्हैसाळकर विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. येथील सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था, बँका यावरही त्यांची मजबूत पकड आहे. आतापर्यंत भाजप स्वतंत्र लढला नसल्याने गावात कोठेही सत्ता उपभोगता आलेली नाही. टाकळी गणात बोलवाड येथील ग्रामपंचायतीची सत्ता घोरपडे गटाकडे आहे. टाकळी येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे व काँग्रेस असे दोन स्वतंत्र गट कार्यरत आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रवादी व काँग्रेस अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्याने मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत भाजप प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला मानणाऱ्या या मतदार संघात भाजपचे कमळ फुलणार का?, याची चर्चा सुरू आहे.मागील निवडणूक जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद केदारराव शिंदे-म्हैसाळकर व मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्यात झाली होती. त्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यावेळी बेडग गावातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, दिलीप बुरसे, तर विजयनगरमधून राजू कोरे यांनी केदारराव शिंदे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. केदारराव शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अलकादेवी यांना संधी मिळाली.आता म्हैसाळ गण खुला असल्याने शिंदे-म्हैसाळकर व पाटील घराण्यातील दिग्गज मैदानात उतरणार आहेत. या गणातून केदारराव शिंदे यांचे पुत्र पुष्पराज शिंदे, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दौलतराव शिंदे-म्हैसाळकर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलाससिंह शिंदे-म्हैसाळकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, भाजपचे धनंजय कुलकर्णी, भरत कबुरे यांच्या नावांची चर्चा आहे. वड्डी गणातून राजू वजीर, सुलेमान मुजावर, जहांगीर जमादार, रमेश नंदीवाले, विलास मोकाशी ही नावे पुढे येत आहेत. म्हैसाळ जिल्हा परिषद गटाची पुनर्रचना झाली आहे. त्यातच या गटाबाहेरील गावातील एक माजी सरपंच भाजपच्या गळाला लागला आहे. त्यामुळे भाजपने या मतदार संघात जास्त लक्ष घातल्याने स्थानिक नेत्यांना सावधगिरी बाळगत प्रत्येक पाऊल उचलावे लागणार आहे.