शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

सांगलीत शाही थाटात संस्थानच्या गणपतीला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 7:12 PM

सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साहवर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि ह्यगणपतीबाप्पा मोरयाऽऽह्णचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला. 

ठळक मुद्देश्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दरबार हॉलमध्ये श्रींची आरतीपावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्सावात रथयात्रा...उत्सवमूर्तीवर पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण

सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साह वर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि गणपतीबाप्पा मोरयाऽऽचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला. 

श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये श्रींची आरती करण्यात आली. श्रींची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पान-सुपारीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, शेखर माने, बजरंग पाटील, अनिल पाटील-सावर्डेकर, समित कदम उपस्थित होते. पान-सुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, तसेच ढोल-ताशा व ध्वजपथक, मुलींचे लेझीम पथक, हलगी पथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. रथयात्रेचा मार्ग रांगोळ्यांनी रेखाटला होता.

दुपारी सव्वाचारला रथयात्रा राजवाडा चौकात आली. तेथे काहीकाळ ती थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण करण्यात येत होती.

गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौकमार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ अशा जयघोषात श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.पावसाचे आगमन

रथयात्रा राजवाडा चौकात आल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भाविकांची धावपळ झाली. मिरवणुकीतील पथकांनी मात्र जागा सोडली नाही. भाविकांनी भर पावसात भिजत मिरवणुकीचा काहींनी लुटला. दहा मिनिटे पाऊस सुरू होता.