सांगली : कोरोनाग्रस्तांची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी मिथिलीन ब्ल्यू अैाषध अत्यंत परिणामकारक असल्याचा दावा येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व बामणोली येथील विवेकानंद रुग्णालयाचे डॉॅ. राम लाडे यांनी शुक्रवारी केला. यामुळे कोरोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबत असल्याचे डॉ. लाडे म्हणाले.
वित्तसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना सहकार भारतीतर्फे विनाशुल्क वाटप करणार असल्याचे सचिव संजय परमणे यांनी सांगितले. यावेळी आयुष संस्थेचे अमोल पाटील, रितेश शेठ, सहकार भारतीचे एच. वाय. पाटील, श्रीकांत पटवर्धन आदी उपस्थित होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले की, निरोगी व्यक्तीने मिथिलीन ब्ल्यूचा नियमित वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही. वापराविषयी जागतिक संशोधने सुरू असून डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होतील. आतापर्यंतच्या चाचण्यातून अत्यंत चांगले निष्कर्ष हाती आले आहेत. कोणतेही दुष्परिणाम नाहीत. वर्षानुवर्षे वापर करता येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक अैाषधांच्या यादीत त्याचा समावेश आहे.
ते म्हणाले की, मिथिलीन ब्ल्यू ही मूळ भारतीय वनस्पती नीळ म्हणून वापरली जाते. सांगली-मिरजेतील सहा-सात रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी वापर सुरू आहे. एक ग्राम पावडरमधून एक लिटर औषध तयार होते. कुटुंबाला महिनाभर पुरते. मूत्रपिंडाचे विकारग्रस्त वगळता अन्य सर्वांना ते चालते.
चौकट
मिथिलीन ब्ल्यू असे काम करते...
कोरोनामुळे फुफ्फुसामध्ये जाळी तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा घटतो. ही जाळी हटविण्याचे काम मिथिलीन ब्ल्यू करते. त्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढते. डॉ. लाडे म्हणाले की, विवेकानंद रुग्णालयातील ४५० रुग्णांसाठी वापर केला, त्याचे चांगले परिणाम दिसले. श्रीगोंदा येथील ४४ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचा एचआरसीटी स्कोअर २४ पर्यंत होता, तो रुग्णदेखील मिथिलीन ब्ल्यूच्या वापराने धोक्याबाहेर आला.
चौकट
असा केला जातो वापर
रुग्णालयांत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेब्युलायझरमधून मिथिलीन ब्ल्यूचा वापर केला जातो. सर्वसामान्य नागरिक दररोज एक चमचा द्रावण तोंडाद्वारे घेऊ शकतो. रात्री झोपताना नाकपुडीत एकेक थेंब सोडावा. सध्या सांगलीत आयुष सेवाभावी संस्था, डॉ. पटवर्धन यांचे रुग्णालय, गुजराती हायस्कूल आदी ठिकाणी विनाशुल्क वाटप सुरू आहे. प्रत्येक रुग्णालय आाणि औषध दुकानांतही विकत मिळते.