सांगली : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते. आम्हीही आमच्या पक्षीय दौऱ्याची तयारी मध्यावधीची शक्यता गृहीत धरूनच करीत आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केले .ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याऊलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले हे मी माज्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो त्यावेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानाचा फरक आहे.
सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. शिवसेनेबरोबरच आता कॉंग्रेसचेही अस्तित्व संपल्यात जमा आहे. त्यांची सध्याची दशा पाहिली तर पक्ष दिशाहीन झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्रीपदासाठी तीनवेळा कॉंग्रेसने आश्वासन देऊन विमानाने मला दिल्लीला नेले. शब्द मला देऊन इतरांनाच मुख्यमंत्री केले. या गोष्टी मला रुचल्या नाहीत. आजवर कधी पदांच्या अपेक्षेने काम केले नाही, मला माझ्या मेरिटवरच पदे मिळत गेली आहेत. त्यामुळे यापुढेही अशाच पद्धतीने काम करेन.राज्यातील सत्ताधाऱ्यांना पाठींबा देण्यामागचा माझा उद्देश स्पष्ट आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सरकारबरोबर रहावे लागते. विरोधात राहून कामे होणे कठीण असते. शिवसेना मात्र सत्तेत राहून गेल्या काही वर्षातकोणत्याही घटकाचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाली नाही.
पक्षीय दौरा करताना मला शेतकरी, व्यापारी, उद्योजक व सामान्य जनतेचे प्रश्न जाणवतात. शासनाने त्यांच्या धोरणात काही बदल केले तर निश्चितपणे ही परिस्थिती बदलू शकते. सरकारबद्दलची नाराजी असली तरी प्रमाणापेक्षा ती जास्त पसरविली जात आहे. पक्ष म्हणून आम्ही असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.शिवसेनेकडूनही होती आॅफरपरखड स्वभावामुळे माझे नुकसान झाले, असे मी समजत नाही. कारण आजवर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते किंवा अन्य कोणतीही पदे मिळाली ती माझ्या स्वभावामुळेच मिळाली. आजही सर्वच पक्षांकडून मला आॅफर मिळतआहेत.शिवसेनेकडूनही वर्षभरापूर्वी मला पक्षात येण्यासाठी आॅफर होती, मात्र मी ती नाकारली. त्यामुळे स्वभावात फरक करणार नाही. मी जसा आहे तसाच राहणार, असे राणे म्हणाले.
माझी फसवणूक होणार नाही...कॉंग्रेसने वारंवार मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन फसविले असले तरी भविष्यात भाजप किंवा अन्य कोणी मला फसवेल, असे वाटत नाही. मी फसणारा माणूस नाही, असे राणे म्हणाले.दिवाकर रावते सर्वात निष्क्रीय मंत्रीपराभूत झालेल्या लोकांना विधानपरिषदेवर घेऊन शिवसेनेने त्यांच्या गळ््यात मंत्रीपदाची माळ घातली. प्रत्यक्षात दिवाकर रावतेहे अत्यंत निष्क्रीय मंत्री मंत्री निघाले. तीन वर्षात यांना एकही काम करता आले नाही, अशी टीका राणे यांनी केली.पन्नास टक्के पाप शिवसेनेचेराज्यातील शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दूर झाले नाहीत.त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यातील पन्नास टक्के पाप हे शिवसेनेचे आहे, असा आरोप राणे यांनी केला.गुजरातमध्ये भाजपच सत्तेवर येणारगुजरात विधानसभेत चूरस असली तरी भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत राणे यांनी येथे केले.