शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन दोन लाख लिटरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 5:34 PM

चारा उपलब्धतेमुळे दररोज १५ लाख लीटर दूध संकलन

सदानंद औंधेमिरज : चांगला पाऊस व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे.सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लीटर दूध संकलन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात इतर शहरात निर्यात व दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी वापर होते. पावसाळ्यानंतर चार महिन्यांच्या काळात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असल्याने दूध उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. यावेळीही पुष्ठकाळात उत्पादन वाढल्याने दूध उत्पादन दैनंदिन १७ लाख लीटर वर पोहोचले असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात दैनंदिन १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दूध उत्पादन १७ लाख लीटरपर्यंत गेले आहे. पुरेशा पावसाने चारा उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअऱ्या, १७ मल्टीस्टेट दूध संघ दूध संकलन करतात. खासगी डेअऱ्यांचे दररोज १२ लाख लीटर दूध संकलन असून त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोज ८ लाख लीटर संकलन आहे. पावडर निर्मितीसाठी येणारे मराठवाड्यातील अतिरिक्त दूध बंद झाल्याने ३ लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेची मिरज शासकीय दूध डेअरी मात्र बंद पडली आहे.अनुदान योजना केली बंदशासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लीटर ५ व सात रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ४० हजार दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर अनुदान पाठविण्यात येत होते. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यासाठी दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना होती. योजना नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने खासगी व सहकारी दूध संघांनी दूध दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादन

  • ऑगस्ट -१६ लाख २४ हजार २९८ लीटर
  • सप्टेंबर- १६ लाख ९० हजार ९७७ लीटर
  • ऑक्टोबर -१७ लाख १६ हजार ०८५ लीटर
टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध