शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:13 PM

प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत

सांगली : प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत. गेल्या काही वर्षात मैदानातला कल कोल्हापूरकरांनी दाखवून दिला आहे. त्यामुळे आम्ही जे काही ठरलंय ते रणांगणातच करू, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नूतन खासदार धनंजय महाडिक यांना अप्रत्यक्षपणे लगावला.पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनकडून सांगली ब्रँडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता नामफलकाचे उद्घाटन सतेज पाटील यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.ते म्हणाले की, आम्ही मैदानात कसे उतरतो ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे सवयीप्रमाणे आम्ही रणांगणातच काय करायचे ते करू. विधान परिषदेतील भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असला तरी तो खरा ठरणार नाही. आम्हाला ताजा अनुभव आहे. त्यामुळे ज्या त्रुटी राहिल्या त्या दुरुस्त करून आम्ही महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणू. यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येणार आहे.राहुल गांधी यांच्या चौकशीबाबत ते म्हणाले की, ज्या ईडीचे नाव पूर्वी पाच लोकांना माहीत होते, आता ती ईडी गल्ली-बोळातील लोकांनाही माहीत झाली आहे. इतका या यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाही अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. आमचे नेते यातून सहीसलामत बाहेर पडतील.

महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी

देहू येथील समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नसल्याबाबत पाटील म्हणाले, नेमके तेथे व्यासपीठावर काय घडले हे आपल्याला माहीत नाही. पण, जाणीवपूर्वक अजित पवारांना प्रोटोकॉलनुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आले असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.

राज्यसभेचा निकाल आम्ही स्वीकारलासतेज पाटील म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत जो निकाल लागला, तो आम्ही कोल्हापूरकर म्हणून स्वीकारला आहे. काही स्थित्यंतरे स्वीकारावी लागतात. खिलाडूवृत्तीने आम्ही ती स्वीकारली आहेत. पुढे काय करायचे ते पाहू.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक