सांगली : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगली व मिरज येथील आयसोलेशन कक्षांना भेटी देऊन पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.
राज्यात वेगवेगळ्या अन्न्ा व औषध प्रशासनाने राज्यात वेगवेगळ्या 1674 ठिकाणी तपासणी केली आहे. यामध्ये 15 ठिकाणी कारवाई करुन 1 कोटी 14 लाखांचा सॅनिटायझर व अन्य साहित्यांचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
रुग्णांना हातळण्यासाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाला कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याचाही त्यांनी आढावा घेतला. या पथकाला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्र. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. दिक्षीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अन्न व औषध प्रशासनाचे श्री. भांडारकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी समन्वय ठेवून काम करावे असे सांगून करोना संसर्ग रोखण्यामध्ये जनतेने फार मोठे सहकार्य दिले असून यापुढेही जनतेने सहकार्य करावे. येणारा टप्पा हा अत्यंत महत्वाचा असून हा हाताळण्यात यशस्वी होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.