शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

कोल्हापूर, सांगलीसाठी खूशखबर; दोन स्वतंत्र ‘वंदे भारत’ धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:57 AM

प्रवाशांना दिलासा : पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवसांचा प्रवास

अविनाश कोळीसांगली : गणेशोत्सवाच्या काळात सांगलीकोल्हापूरकरांसाठीरेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. गेला आठवडाभर अनेक वादविवादांनंतर रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर ते पुणे व हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दिला असून, १६ सप्टेंबरपासून त्या धावतील. या निर्णयानंतर प्रवासी संघटनांनी आनंद व्यक्त केला.हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने अचानक या मार्गात बदल करून याच गाडीला कोल्हापूरचा थांबा दिला होता. मात्र, वळसा घालून प्रवास होणार असल्याने त्यात प्रवासाचा वेळ अडीच ते तीन तासांनी वाढणार असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी अशा मार्गास विरोध केला. त्यातच सांगलीचा थांबा रद्द केल्यानंतर सांगलीच्या नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता.पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाला आदेश दिले. त्यानंतर कोल्हापूर व हुबळीसाठी दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील देण्यात आला. सायंकाळी रेल्वेचे कोचिंग विभागाचे संचालक संजय नीलम यांनी दोन्ही एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले.

कोणत्या दिवशी धावणार रेल्वे

  • कोल्हापूर ते पुणे वंदे भारत (क्र. २०६७३) ही प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार असून, पुणे ते कोल्हापूर वंदे भारत (क्र. २०६७४) ही प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार आहे.
  • हुबळी ते पुणे वंदे भारत (क्र. २०६६९) ही बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी १:३० वाजता पुण्यात पोहोचेल तर पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) ही गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी २:१५ वाजता सुटेल. आणि रात्री १०:४५ वाजता हुबळीत पोहोचेल. या गाडीला धारवाड , बेळगावी, मिरज ,सांगली, सातारा असे पाच थांबे आहेत.

अशी धावणार कोल्हापूर-पुणे वंदे भारत

  • कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल. मिरजेत ९ वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत ९:४२ ला, कराडला १०:०७, साताऱ्यात १०:४७ तर पुण्यात १:३० वाजता पोहोचेल.
  • पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार असून, साताऱ्यात ४:३७, कराडला ५:२५, किर्लोस्करवाडीत ५:५०, सांगलीत ६:१८, मिरजेत ६:४० तर कोल्हापुरात ७:४० ला पोहोचेल.
टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस