मिरज-पंढरपूर रस्त्यावरील साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागे स्वामी विवेकानंदनगर येथे अभियंता अमित फाकडे यांचा शार्दूल निवास हा बंगला आहे. फाकडे परगावी गेल्याची संधी साधून दि. १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फाकडे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. बेडरुममधील दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, अडीच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोख रक्कम असा साडेसात हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अमित फाकडे हे घरी परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. याबाबत त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शहर व परिसरात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी रमा उद्यान येथे बंगला फोडण्यात आला होता. चोरटे बंद बंगले फोडत असल्याने पोलिसांनी रेकाॅर्डवरील चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
मिरजेत बंगला फोडून दागिने, रोख रक्कम चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:25 AM