मिरज : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मिरज - कोल्हापूर व कोल्हापूर - मिरज पॅसेंजर रेल्वे सेवा उद्या गुरूवार (दि. १५) पासून पुन्हा सुरु होणार आहे. मिरज - कोल्हापूर व कोल्हापूर - मिरज या पॅसेंजरच्या नियमित फेऱ्या सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून मिरज स्थानकातून सुटणाऱ्या मिरज - कोल्हापूरसह सर्वच पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मिरजेतून दररोज नोकरी व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला जाणाऱ्या - येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे कोल्हापूर - मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी होती.कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वे सेवाही पूर्ववत होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर - मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. मिरज - कोल्हापूर पॅसेंजर दररोज दुपारी २.१४ वाजता सुटून दुपारी सुटून ३.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. कोल्हापूर - मिरज पॅसेंजर दररोज सकाळी १०.३० वाजता कोल्हारातून सुटून दुपारी ११.४५ वाजता मिरज स्थानकात पोहोचणार आहे. आता मिरज - पंढरपूर मार्गावरही पॅसेजर सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:57 PM