मिरज : शासनाने सेस निधीत वीस टक्के कपात केल्याच्या निषेधार्थ मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत १९ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. सभापती शालन भोई यांनी हे सामुदायिक राजीनामे फेटाळले. मिरज-पेठ या राष्टÑीय महामार्गाच्या कामावरून पश्चिम भागातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत उपअभियंत्यास धारेवर धरले.
मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती शालन भोई यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. शासनाकडून पंचायत समित्यांना मिळणारा निधी अगोदरच बंद केला आहे. त्यामुळे सदस्यांच्या वाट्याचा सेसचा निधी उरला आहे. तोही ५० ते ५५ हजार इतका तोकडा मिळत असताना, राज्य शासनाने पंचायत समित्यांना विश्वासात न घेता सेस निधीत अचानक सुमारे वीस टक्के कपात करून पंचायत समिती सदस्यांना नामधारी करण्याचा प्रयत्न केल्याने, याचे पडसाद पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले.
सभेस अनुपस्थित असलेल्या दोन महिला सदस्या वगळता उपसभापती काकासाहेब धामणे, अनिल आमटवणे, अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, किरण बंडगर, राहुल सकळे, विक्रम पाटील, कृष्णदेव कांबळे, सतीश कोरे यांच्यासह काँग्रेस, राष्टÑवादी व सत्ताधारी भाजपच्या १९ सदस्यांनी निधी कपातीच्या निषेधार्थ सभापती भोई यांच्याकडे सामुदायिक राजीनामे दिले. शासनाकडे सेससह वाढीव निधी देण्याची मागणी केली. सभापती शालन भोई यांनी सामुदायिक राजीनामे फेटाळले.
पेठ ते मिरज राष्टÑीय महामार्गावरील अकरा कि.मी. रस्ता कामाच्या टेंडर प्रक्रियेत करण्यात आलेले बदल व खराब रस्त्यामुळे होणारे अपघात यावरून सभेत पश्चिम भागातील सदस्य अनिल आमटणे, अजयसिंह चव्हाण, अशोक मोहिते, राहुल सकळे या सदस्यांनी आक्रमक होत उपअभियंत्यास धारेवर धरले. पेठ-मिरज या राष्टÑीय महामार्गावरील तुंग ते सांगली या मार्गाच्या कामाला मंजुरी असताना केवळ चार कि.मी. अंतराचे काम केले जात असल्याने उर्वरित रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघात थांबत नाहीत. अनेकांच बळी जात आहेत. यास केवळ अधिकारी जबाबदार आहेत. ११ कि.मी. रस्ता कामाचे टेंडर असताना चार कि.मी. अंतराचे काम का केले जात आहे, टेंडर प्रक्रिया का बदलली, असा जाब या सदस्यांनी विचारत दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या पाहणीसाठी उपअभियंता पन्हाळकर यांना नेण्यासाठी आसन सोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. सदस्यांच्या या आक्रमकतेने सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
तुंग ते सांगली या अंतराच्या रस्ता कामासाठी ६ कोटी ९१ लाख रूपये मंजूर होते. मात्र ठेकेदरााने पाच टक्के कमी दराने टेंडर भरल्याने ६ कोटी ९१ लाख रूपये खर्चात तुंग ते सांगली या रस्त्याचे काम होत नसल्याने ५ कोटी ४५ लाख रूपये निधीचे चार कि.मी.चे काम सुरू असल्याचे उपअभियंता आर. एस. पन्हाळकर यांनी सांगताच, सदस्यांनी पन्हाळकर यांना पुन्हा धारेवर धरत अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळेच उर्वरित सात कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. सध्या या नादुरूस्त रस्त्यात अपघात व मृत्यू हे नित्याचे बनले आहे. उर्वरित सात कि.मी. रस्त्याला निधी उपलब्ध करून तो पूर्ण न केल्यास होणाºया अपघातास अधिकाºयांना कारणीभूत धरून गुन्हा दाखल करण्याच्या ठरावाची मागणी सदस्यांनी केली. सभापती भोई यांनी त्यांच्या ठरावाची सूचना केली. या विषयाबरोबर मिरज पूर्व भागात नव्याने केलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अधिकाºयांना धारेवर धरले. अधिकारी सावंत यांनी तक्रार निवारणाचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची हमीसोनी परिसरात क्रशरमुळे पिके व द्राक्षांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी अनिल आमटवणे व कृष्णदेव कांबळे यांनी केली. यावर सभापती शालन भोई व उपसभापती काकासाहेब धामणे यांनी रत्नागिरी-नागपूर रस्ता कामाच्या प्रोजेक्ट मॅनेजरना बोलविण्याची सूचना केली. स्टोन क्रशरने पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची हमी व्यवस्थापक तिवारी यांनी दिली.