मिरजेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिक्षाचालकांवर ऑनलाईन दंडाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अनेक रिक्षाचालकांनी महिन्यापासून दंडाची रक्कम भरली नसल्याने काही महिन्यांपासून थकीत असलेली दंडाची रक्कम भरण्यासाठी वर्षाअखेरपर्यंत वाहतूक शाखेने मुदत दिली होती. थकीत दंडाची रक्कम वाहतूक शाखेकडे भरावी, अन्यथा १ जानेवारीपासून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी दिला होता. मात्र, दंडाची रक्कम जमा करण्यास रिक्षा चालकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने वाहतूक शाखेतर्फे थकीत दंड वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली. तीन दिवसांत वाहतूक शाखेने २ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यापुढेही दंड वसुली मोहीम सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.
मिरजेत वाहतूक नियंत्रण शाखेची रिक्षांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:25 AM