सांगली : सांगली शहरात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले होते. शुक्रवारी मिरज शहरातील कमानवेस परिसरात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.शहरात रुग्ण आढळल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गुरुवारी घेतलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांपेकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. शुक्रवारी ३७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल शनिवारी येणार आहेत. रॅपिड ॲण्टीजन टेस्टचे २० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचवेळी मिरज शहरात मात्र, कोरोना रुग्ण आढळला आहे. या महिला रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याने होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.शहरात सर्दी, ताप लक्षणे आढळल्यास घरीच उपचार न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरजेत कोरोनाबाधित आढळला, सांगली मनपा क्षेत्रात रुग्णसंख्या तीनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 1:26 PM