शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

मिरजेत पंचरंगी लढतीने चुरस

By admin | Published: October 01, 2014 11:21 PM

फटका कोणाला? : बंडखोर, शिवसेनेमुळे भाजप, काँग्रेससमोर आव्हान

सदानंद औंधे--मिरज-युती व आघाडी संपुष्टात आल्याने मिरजेतील विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवाराच्या मतविभागणीचा फटका भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस बंडखोर यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज मतदारसंघात गतवेळी भाजपने विजय मिळविला. मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे. गेल्या पाच वर्षात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आ. सुरेश खाडे यांचे फारसे सख्य नव्हते. आता तर, युतीच तुटल्याने शिवसेना कार्यकर्त्यांना त्याचे उट्टे काढण्याची संधी मिळाली आहे. पूर्व भागातील रस्ते, म्हैसाळचे पाणी या प्रश्नावरून मतदारांत असलेल्या नाराजीचा आ. सुरेश खाडे यांना सामना करावा लागणार आहे. पूर्व भागातील गावांत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात भाजपला मदत केली होती. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत राष्ट्रवादीची भाजपला मदत मिळणे दुरापास्त आहे. जयंत पाटील यांच्या दबावामुळे घोरपडे समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्ते बाळासाहेब होनमोरे यांच्या प्रचारात दिसत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते भाजपला धडा शिकविण्याची घोषणा करीत आहेत. शिवसेनेतर्फे तानाजी सातपुते या एकेकाळच्या खाडे यांच्या समर्थकाला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.पालकमंत्री पतंगराव कदम यांचे समर्थक सिध्दार्थ जाधव यांना उमेदवारी दिल्याने माजी मंत्री मदन पाटील व प्रतीक पाटील समर्थक अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर या आर्थिकदृष्ट्या मातब्बर उमेदवाराने बंडखोरी केली आहे. यामुळे मिरज तालुक्यातील मदन पाटील यांचे समर्थक कोणती भूमिका घेणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद डावरे यांना जनसुराज्य पक्षाची उमेदवारी मागे घेतली आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आल्याने, मतविभागणीची शक्यता आहे. मिरजेत अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने अल्पसंख्याकांची गठ्ठामते मिळाल्यास काँग्रेस उमेदवाराची सरशी होऊ शकते. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस बंडखोर यांच्यामुळे अल्पसंख्याक मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मनसेचे उमेदवार नितीन सोनवणे यांचा कितपत प्रभाव पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच सदस्य असतानाही, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत छुप्या मदतीच्या बळावर मिरजेत मताधिक्य मिळविणाऱ्या भाजपला यावेळी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सुनील होवाळे, उमेश धोंडे, जयकुमार निकम, प्रकाश बाबर, प्रतीक्षा सोनवणे, संजीव पोकरे हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत.मिरजएकूण मतदार ३,०१,२००नावपक्षसुरेश खाडेभाजपसिध्दार्थ जाधवकाँग्रेसबाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादीदीपक गायकवाड लोकशासन पार्टीतानाजी सातपुते शिवसेनानितीन सोनवणेमनसेविशाल सोनवणे शेतकरी संघटनातुकाराम बल्लाळ बहुजन रयत पार्टीसंतोष आवळे बहुजन शक्ती पार्टीसी. आर. सांगलीकरअपक्षयोगेंद्र थोरातअपक्षविद्यासागर कांबळेबसपासुरेखा शेख राष्ट्रविकास पार्टी