मिरज - मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रातील मानसकन्या उषा हजारे हिचा विवाह राजेश पवार यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. महापालिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या, आस्था बेघर महिला निवारा केंद्रातील या आगळावेगळ्या विवाहात कन्यादासाठी महापालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. ''बेघर केंद्रातील मुली बरोबर विवाह झाला" म्हणजे आम्हाला विचारणारे कोणी नाही, असे कोणी समजू नये. त्यांच्यासोबत महापालिका खंबीरपणे पाठीशी उभी आहे. संकटग्रस्त महिलांना स्वावलंबी बनवणे हेच केंद्राचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बेघर केंद्रातर्फे ज्येष्ठांचा विवाह व पुनर्विवाह झालेल्या दाम्पत्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार आयुक्त सुनील पवार यांनी केला. यावेळी आयुक्त पवार यांच्यासोबत वधूवरांची वाजंत्री सह वरात काढण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील,श्रीमती जयश्री मदन पाटील, माजी महापौर संगीता खोत, शांतिनिकेतनचे गौतम पाटील, माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते इंद्रजीत घाटे, सदाशिव मगदूम, महेंद्र गाडे, आयुब इनामदार, जहीर मुजावर, रेखा पाटील, सुचित्रा पवार, परशुराम कुंडले, राजेश साळुंखे यांच्यासह मान्यवरांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या. प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे प्रस्ताविक यांनी व केंद्र संचालिका सुरेखा शाहीन शेख यांनी स्वागत केले. प्रकल्प व्यवस्थापक मतीन अमीन यांनी आभार मानले. शाहीन शेख व सुरेखा शेख यांनी संयोजन केले.