जल्लोष भोवला : सांगलीत सातजण अटकेतलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सार्वजनिक ठिकाणी मित्राचा वाढदिवस साजरा करताना केलेली हुल्लडबाजी व जल्लोष सातजणांच्या चांगलाच अंगलट आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता या सर्वांना अटक केली. त्यांना मित्राचा वाढदिवस सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत साजरा करावा लागला.अटक केलेल्यांमध्ये सागरेश्वर रामाप्पा घुगवडे (वय २२, पेठभाग), रोहित रामचंद्र हिसले (२२, सराफ कट्टा, जैन बस्तीजवळ), मंदार विजय भोसले (२१, चांदणी चौक), कौस्तुभ नंदकुमार बापट (२०, जुन्या वेदशाळेजवळ), असीफ अस्लम मुल्ला (२१, दत्तनगर), वृषभ राजेंद्र वेलणकर (२२, गणपती मंदिरजवळ) व रमणप्रीतसिंग चरणप्रीतसिंग राठोड (२०, पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.संशयित वृषभ वेलणकर याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी सर्वजण गणपती मंदिराजवळील पांजरपोळजवळ जमले. वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण याठिकाणी जोरजोरात ओरडू लागले, हुल्लडबाजी करीत होते. यावेळी निरीक्षक राजन माने यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. पथकाने सर्वांना ताब्यात घेतले.
मित्राचा वाढदिवस पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:44 AM