शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, सांगली महापालिका प्रशासनाला कधी येणार जाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:06 IST

सांगलीकरातून संतप्त प्रतिक्रिया

सांगली : महापालिका क्षेत्रातील मैलामिश्रीत शेरीनाल्याचे पाणी गेल्या चार दिवसांपासून सांगलीत थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासन किती दिवस दुर्लक्ष करणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष असल्याबद्दल नागरिकांनी बुधवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याला सात ते आठ दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. नदीकाठचे नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.सांगली शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय गंभीर निर्माण झाला आहे. सांगली बंधाऱ्यामुळे नदीपात्रातील पाणी थांबून आहे. पाणी वाहते नसल्यामुळे त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. शिवाय शेरीनाल्याचे सांडपाणीही वर्षानुवर्षे नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष नाही. शेरीनाल्यावरील चारही पंप सुरू असले, तरीही काही प्रमाणात सांडपाणी शेरीनाल्यावरून नदीत मिसळते.गेली ३५ ते ४० वर्षे सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न चर्चेत आहे. अनेकजण आमदार, खासदार झाले; पण शेरीनाल्यापासून सांगलीकरांची मुक्तता कोणीही केली नाही. सांगलीकरांच्या आरोग्याशी, जिवाशी खेळ सुरू आहे. त्याचे राजकीय नेतृत्वाला काही देणे-घेणे नाही. कृष्णा नदीची सांगलीत गटारगंगा केलेली आहे, आता दुर्गंधीही पसरलेली आहे.

प्रदूषण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सर्जेराव पाटीलनवीन पुलाच्या वरच्या बाजूस पंपिंग स्टेशन आहे. तिथपासून ते सांगली बंधारामधील पाणी वापरासाठी उचलले जात असले, तरी शेरीनालामधून पाणी नदीत सोडले जाते. तसेच, काही पाणी नदी काठावरून बंधारा खाली सोडले जाते. परंतु, गेली कित्येक दिवस शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला मिसळत आहे. म्हणून, पाण्याला दुर्गंधीचा वास येत असल्याचे प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांना फोनवरून १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कळवले होते. पण, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीriverनदीpollutionप्रदूषण