आटपाडी: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाऊबीज पालात राहणाऱ्या आदिवासी भगिनींच्या समवेत साजरी केली. विकासापासून कोसो दूर असलेल्या भगिनींच्या पाठीशी एक भाऊ म्हणून सदैव राहण्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.आनंदाचा, उत्साहाचा दीपावली सण ही भटकंती करून लाकडी कोळसा निर्माण करणाऱ्या कुटुंबांना पालामध्येच करावा लागत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक विनायक पाटील यांनी या कुंटुंबीयांना कपडे, फराळ व जीवनावश्यक साहित्य भेट दिले. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आमदार पडळकर यांनी ही दीपावली पालात राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुटुंबासमवेत साजरी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान पडळकर यांनी करगणी, खरसुंडी, झरे, आटपाडी येथे राहत असणाऱ्या आदिवासी, पारधी, लमाण, यांच्यासह भटकंती करणार्या कुटुंबाच्यामध्ये जाऊन दीपावलीचा सण साजरा केला. सुमारे शंभराहून अधिक कुटुंबाच्या समवेत त्यांच्यासह सहकाऱ्यांनी दीपावलीचा आनंद साजरा केला
आमदार पडळकरांनी आदिवासी भगिनींच्या समवेत साजरी केली भाऊबीज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 4:18 PM