शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

..मग शरद पवार ४० वर्षे झाडू मारत होते का?, गोपीचंद पडळकरांनी केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:58 PM

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?

ढालगाव : ‘मला महाराष्ट्राची सत्ता द्या, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकतो’, असे शरद पवार म्हणतात, मग गेली ४० वर्षे ते लोटत बसले होते काय? असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. गुरुवारी (आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) येथे बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.पडळकर म्हणाले, प्रस्थापितांना गाडण्यासाठी आपण अठरापगड जातींनी आवश्यक ते सर्व केले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी त्यागाचीही तयारी ठेवायला हवी. आरेवाडीच्या बिरोबाची माती जो कपाळाला लावेल, तो कोणालाही भिडू शकतो, एवढी क्षमता या मातीत आहे. धनगड व धनगर यातील फरक संपला असून, त्याबाबतचे शुद्धिपत्रक आजच काढले आहे. धनगर समाजाची मागणी मान्य करून शासनाने दसरा उत्सव साजरा करण्याची संधी आम्हा धनगर बांधवांना द्यावी. हा दसरा मेळावा भविष्यात असाच वाढत राहिला, तर आरेवाडी हे राजकारणाचे केंद्र बनेल.प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उल्हास धायगुडे, समाधान कोळेकर, दादा लवटे, दौलत शितोळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, बिरोबा देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, पोलिसपाटील रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मराठ्यांची फसवणूक कशासाठी?गरीब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले तर सर्व प्रश्न सुटतील, असा समज करून मराठ्यांची फसवणूक का करता? मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे का लावता? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Sangliसांगलीreservationआरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार