शिराळा : गेल्या चार दिवसांत शिराळा मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसाने वारणा, मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे माेठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
त्यांनी शिंगटेवाडी परिसराची पाहणी केली. मांगले येथे देववाडी लोक व जनावरे स्थलांतरित केलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, कुंडलवाडी येथे भेटी देऊन नागरिकांकडून परिस्थितीची चौकशी केली. कणेगाव व भरतवाडी येथे वारणेच्या पुराचा वेढा पडल्याने नागरिकांना तांदूळवाडी व बहादूरवाडी येथे स्थलांतरित केले आहे. तेथे भेट देऊन विचारपूस केली. कामेरी येथे पोल्ट्री फार्मला भेट दिली. येथे पाण्यात बुडून १५ हजार कोंबड्या मृत झाल्या. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठ येथे तीळगंगा ओढ्यास पूर येऊन मोठी हानी झाली आहे. त्याचीही पाहणी केली.