शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 5:22 PM

कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवण

दत्ता पाटीलतासगाव : राष्ट्रवादीच्या फुटीनंतरदेखील पक्षाध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जाेमाने काम सुरू केले आहे. पवारांचा पक्षबांधणीचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर फिरणाऱ्या आमदार रोहित पवार यांना आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी साथ दिली आहे. या दोघांनी ‘साहेबांचा संदेश’ घेऊन राज्यभर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांचे भाषण ऐकताना आर. आर. पाटील यांची आठवण येत असल्याचे सभेला उपस्थित राहणाऱ्यांचे म्हणणे आहे. आमदार रोहित पवारांच्या साथीने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षीय नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आबांचा पठ्ठ्या महाराष्ट्र पिंजताना दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी चांगली संधी होती. मात्र, आर. आर. पाटील यांच्या विचारांशी बांधिल राहत शरद पवारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय आबा कुटुंबीयांनी घेतला. वर्षानुवर्षे शरद पवारांशी एकनिष्ठ असणारेदेखील फारकत घेत सत्तेच्या लाटेवर स्वार झाले. मात्र, अशा परिस्थितीतही शरद पवारांकडून वेळोवेळी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. नुकतेच जालना येथे झालेल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने आर. आर. पाटील यांचा गृहमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले.

आबांचा वारसा घेत त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी जाेमाने काम सुरू केले आहे. आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील या युवा नेत्यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. आतापर्यंत कोल्हापूर, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सभा घेण्यात आल्या. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी ज्युनिअर आर. आर. मैदानात उतरल्याचे चर्चा व चित्र दिसत आहे.

कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवणसामान्य माणसाच्या थेट काळजाला भिडणारे बोलणे, भाषणाची लकब हुबेहूब आर. आर. पाटील यांच्यासारखीच. ऐकणाऱ्याला आर. आर. पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही, अशा शैलीत रोहित पाटील भाषण करीत आहे. यामुळे सभेला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना व कार्यकर्त्यांना आर. आर. पाटलांची आठवण येत असल्याचे बोलले जातेय.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारRohit Patilरोहित पाटिल