प्रताप महाडीककडेगाव : राजकीय व्यक्ती म्हटलं की नेहमी आपल्यासमोर एक चित्र उभा राहतं ते पांढरे कपडे, पाठीमागे कार्यकर्त्यांचा गराडा. पण काही नेते असेही असतात की आपल्या बिझी शेड्यूलमध्येही आरोग्याबाबत सजग असतात. त्यातील एक म्हणजे माजी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम. मतदारसंघावर पकड, कार्यकर्त्यांची फौज, प्रभावी वक्तृत्त्व आणि फिजिकल फिटनेससाठी जागरुक असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे.काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेचत आले आहेत. देवराष्ट्रे ते सोनहीरा कारखाना अशा पदयात्रेच्या निमित्ताने फुटबॉलपटू असलेले आमदार कदम चालताना नव्हे तर चक्क धावतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत १० कि.मी अंतर चालत आणि धावत गाठले.२०१२ मध्ये झाली होती मोठी चर्चानेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे विश्वजित कदम हेल्दी राहण्याकडे विशेष लक्ष देत असतात. दिवस कितीही गडबड, गोंधळाचा असूद्यात पण त्यातूनही फिट राहावे म्हणून ते विशेष वेळ काढत असतात. सन २०१२ मध्ये त्यांच्या फिटनेसबाबत मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी बुलढाणा ते सांगली अशी ६०० कि.मी अंतराची संवाद पदयात्रा काढून दुष्काळी पट्ट्यातील लोकांना मदत करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध योजना लोकांना मिळवून दिल्या. त्यानंतर आता ते काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेच्या निमित्ताने १० कि.मी अंतर चालताना आणि धावताना दिसले.सत्ता असो वा नसो नेतृत्व ओक्केचप्राणायाम, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीवर आमदार कदम यांचा भर असतो. त्यांनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर गल्ली पासून दिल्ली पर्यंत आवाज उठवत मोर्चे आंदोलने आणि पदयात्रा काढून सरकारला जाग आणण्यासाठी कार्यरत राहण्याची त्यांच्यात क्षमता आहे. यामुळे सत्ता असो वा नसो आमचं नेतृत्व ओक्केच अशी प्रतिक्रिया पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते देत आहेत.
आझादी गौरव यात्रेत आमदार विश्वजित कदमांनी १० कि.मी अंतर चालत, धावत गाठले, कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:49 AM