सांगली : ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला वेदना झाल्या. परंतु, मीही आमदारकीचा राजीनामा दिल्याचा गैरसमज सोशल मीडियामधून पसरविला जात आहे. परंतु, मी राजीनामा दिलेला नाही, कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु, भाजपमध्ये अद्याप प्रवेश केलेला नाही. पुढील दोन दिवसांत पर्यायाविषयी निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत विश्वजित कदम यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कदम यांनी एका व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, “जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये. माझ्या पलूस- कडेगावच्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही. मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता असून, आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.”
गैरसमज नको, मी राजीनामा दिला नाही : विश्वजित कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:06 PM