सांगली : मॉडेल शाळांसाठी मनरेगातून कंपाऊंड भिंतींची कामे करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन सभेत सदस्यांनी केली. पाझर तलावात शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही देण्यात आले. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
मिटकी येथील तलावाच्या कामातील त्रुटींचा अहवाल वालचंद महाविद्यालयाने तयार केला आहे, त्याची एकेक प्रत सदस्यांना देण्याची मागणी सदस्यांनी केली.
जिल्हाभरातील तलावांतील पाणीसाठे कमी होताच जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाकडील कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. भविष्यात अतिवृष्टी झाली, तरी पाझर तलाव फुटणार नाहीत, असे नियोजोन करण्यास अध्यक्षांनी सांगितले. कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला व्यापक सूचना दिल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. जिल्हा परिषदेच्या जीवन प्राधिकरणाकडील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले.
चौकट
भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत अटल भूजल योजना राबविली जाणार आहे. या योजनेतून अतिशोषित व शोषित भागातील भूजल पातळी अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना सदस्यांनी केली.
------