सांगली : शामरावनगर येथील निवृत्त पोलीस अधिकार्याच्या मुलावर खुनीहल्ला करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या टोळीतील मुख्य संशयितावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे. आता या टोळीतील पाचजणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सोमवारी दिली.
टिके म्हणाले की, खुनी हल्ल्यातील संशयित मोट्या ऊर्फ मेघशाम जाधव, वैभव माळी, आकाश सादवाणी, रोहित कांबळे, हेमंत इंगवले यांना अटक करण्यात आली आहे. या पाचजणांच्या हल्ल्यात अमरिश सनगर जखमी झाला आहे.
शहरातील विविध भागांत वारंवार दोन गटांमध्ये वादावादी, मारामारीच्या घटना घडतात. यातील अनेक घटना पोलिसांपर्यंत येत नाहीत. त्यामुळे अशा घटना परस्पर न मिटवता पोलिसात याबाबत तक्रार झाल्यास गुन्हेगारांवर कारवाई करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही कोणतेही प्रकरण परस्पर न मिटवता पोलिसात तक्रार दाखल करावी,
असे आवाहनही त्यांनी केले.