शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

विजेचा धक्का अन् महावितरणची माणुसकी निकामी, सांगली जिल्ह्यातील तिकोंडी येथील कामगाराची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 3:38 PM

डी. ओ जंप जोडण्यास गेले असता बसला विजेचा जोराचा धक्का

गजानन पाटीलदरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील महावितरणचे बाह्यस्रोत कर्मचारी महंमद हुसेन मुजावर हे दहा वर्षांपूर्वी डी. ओ. जंप जोडताना विजेच्या तीव्र झटक्याने गंभीर जखमी झाले होते. उजवा हात व एक मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला. माणुसकीचा पुरवठा खंडित करून महावितरणने त्यांच्यासाठी मदतीचा कोणताही प्रकाश न दिल्याने विजेच्या धक्क्यापेक्षाही जास्त वेदना त्यांना आता सहन कराव्या लागत आहेत.पूर्व भागातील संख येथे ३३ केव्ही विद्युत मंडळ कार्यालय आहे. महंमद मुजावर यांनी कोल्हापूर येथील शासकीय विद्यानिकेतनमध्ये इलेक्ट्रिकलची पदवी घेतली होती. ते तिकोंडी उपकेंद्राअंतर्गत विद्युत अप्रेंटीस सोसायटीमार्फत बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून २०१० पासून कार्यरत होते. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी लाइनमन भडंगे यांच्यासोबत डी. ओ जंप जोडण्यास ते गेले होते. त्यांनी फिडरवर रीतसर परवानगी घेतली होती.ते विद्युत खांबावर चढले. विद्युत पुरवठा बंद न केल्यामुळे त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. ते खांबावरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा उजवा हात पूर्णपणे व उजवी किडनी निकामी झाली आहे. निकामी मूत्रपिंड काढण्यात आले. या घटनेची तक्रार उमदी पोलिस स्टेशन व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली नसल्याची माहिती मिळाली. दवाखान्याचा खर्च कंपनीकडून मिळाला नाही. तीन लाखांचे कर्ज काढून बिल भागविण्यात आले. त्यांना पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. मुलगा लालसाब ऊसतोडणी मजूर म्हणून काम करतो. दुसरा मुलगा दावलमलिक विजयपूर येथे रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतो.पत्नीच्या खांद्यावर जबाबदारीमहंमद मुजावर यांना कायमचे अपंगत्व आल्याने कोणतेही काम त्यांना करता येत नाही. सध्या त्यांना महिन्याला रक्त द्यावे लागते. दवाखान्यासाठी दरमहा आठ हजार रुपये खर्च येतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची पत्नी बेगम्मा मुजावर मोलजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

मुलांना नोकरीची अपेक्षामुजावर यांनी महावितरणकडे त्यांच्या मुलांना अनुकंपाची नोकरी मिळावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला; पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण