लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि डाएटतर्फे शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा झाली. पूर्व प्राथमिक गटातून वर्षा भोसले, प्राथमिक गटातून वनिता मोरे व माध्यमिक, उच्च माध्यमिक गटातून वैशाली आडमुठे यांनी अव्वल क्रमांक मिळविला.
शाळांमध्ये अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. राज्यस्तरीय स्पर्धांचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन स्वरुपात जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या. प्राथमिक शिक्षक गटातून ४४ व माध्यमिक, उच्च माध्यमिक गटातून १५ शिक्षक सहभागी झाले. निकाल असा : प्राथमिक गट - वनिता मोरे (खेराडेवांगी), समिना खलिफा ( बिळूर), शंकर ढेरे (संजयनगर, सांगली), नीलेश कांबळे ( कसबे डिग्रज), वासंती खेराडकर ( शिरगाव कवठे), दिलीप वाघमारे (पांडोझरी), नीता घाटगे ( बोरगाव, ता. तासगाव).
माध्यमिक गट - वैशाली आडमुठे (यशवंतनगर, सांगली), नम्रता पाटील (बोलवाड हायस्कूल), सुधीर बंडगर (गांधी विद्यालय, आरळा), उषा कुलकर्णी ( ज्युबिली शाळा मिरज), सविता रेश्मी (न्यू इंग्लिश स्कूल, माडग्याळ), ज्ञानदा देशपांडे (वारणा प्रसाद विद्यालय, शिराळा), संदीप रोकडे (मारुती विद्यालय, चरण). अंगणवाडी कर्मचारी गट - वर्षा भोसले, आरग.
स्पर्धकांना डाएटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र भोई, यांनी मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून नीता कांबळे, श्रीशैल कामशेट्टी, तुकाराम राजे, वैशाली भोई, चंद्रहास हिप्परकर, अन्नपूर्णा माळी, अश्विनी पाटील, सुजाता पाटील, बाहुबली नोरजे, आदींनी काम पाहिले.
चौकट
पाच विजेते राज्यस्तरावर पात्र
शाळांमध्ये अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. राज्यस्तरीय स्पर्धांचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन स्वरुपात जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या. प्रत्येक गटांतील पहिल्या पाच विजेत्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
--------------