शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Sangli: महसूलच्या चूक अन् जातीच्या चटक्यातच जगणे; कासेगावातील २०० हून अधिक कुटुंबांची फरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:25 IST

इस्लामपूर : महसूल विभागाच्या एका चुकीमुळे पिढ्यान् पिढ्यापासून राहणाऱ्या कासेगाव (ता. वाळवा) येथील २०० हून अधिक कुटुंबांच्या भाळी अतिक्रमणाच्या ...

इस्लामपूर : महसूल विभागाच्या एका चुकीमुळे पिढ्यान् पिढ्यापासून राहणाऱ्या कासेगाव (ता. वाळवा) येथील २०० हून अधिक कुटुंबांच्या भाळी अतिक्रमणाच्या नावाचा शिक्का पडला. तर दुसऱ्या बाजूला अद्याप जाती व्यवस्थेची उतरंड मानणाऱ्या आजी-माजी राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे या भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे राज्यात आजही जाती व्यवस्था कायम असल्याची लाज वाटते, अशा शब्दात डॉ. भारत पाटणकर यांनी संताप व्यक्त केला.कासेगाव (ता. वाळवा) येथील गेल्या ४० वर्षांपासून ऐरणीवर आलेल्या मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रलंबित राहिलेल्या मागासवर्गीय समाजातील अतिक्रमित ठरलेल्या घरांच्या जागा त्या-त्या कुटुंबांच्या नावावर करून देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने या भूमिपुत्रांना घेऊन येथील पंचायत समितीच्या आवारात बेमुदत आंदोलनाला सोमवारी सुरुवात करण्यात आली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते.पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, १९३६ पासून ही कुटुंबे तेथे राहत आहेत. १९७३ साली झालेल्या मोजणीवेळी ही बाब या विभागाच्या लक्षात न आल्याने या जागेवर अतिक्रमण अशी नोंद झाली. शासनाकडून झालेल्या या चुकीची सजा आज ही कुटुंबे भोगत आहेत. शासन आपली चूक मान्य करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळेच या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही.

न्याय देण्यास विलंब १९७४-७५ मध्ये भूखंडांचे वाटप झाल्याचे पुरावे आहेत. १९७७ साली या ठिकाणी शासनाकडून घर बांधणी अनुदानही दिले आहे. ही प्रक्रिया कायदेशीरपणे झाली आहे. तरीसुद्धा भूमिपुत्रांना न्याय देण्यास विलंब होत आहे.

नोंदीचा आधार घ्यावा१९७३च्या मोजणीवेळी झालेल्या नोंदी आधार धराव्यात. १९८३ नंतर जी अतिक्रमणे झाली त्यांच्यासाठी ग्रामपंचायत नोंदीचा आधार घ्यावा. त्याआधारे मूळ खातेदारांच्या वारसांमध्ये क्षेत्र विभागून ५०० चौरस फुटांचा निकष लावून नियमितीकरण करून द्यावे.कासेगावचा प्रश्न प्रलंबित कासेगावच्या या जटिल प्रश्नावर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नितीन करीर यांनी ही जागा गायरानाची नसून ती भूमिहीन व बेघरांसाठी असल्याचे स्पष्ट करत तेथील भूखंडांचे संबंधित कुटुंबांना मोफत वाटप करावे, अशी टिप्पणी केली होती. राज्याचे मुख्य सचिव म्हणून डॉ. करीर निवृत्त झाले. मात्र, कासेगावचा हा प्रश्न प्रलंंबित असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन