शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

देशातील २४ लाखांवर विद्यार्थी देणार उद्या ‘नीट’ची परीक्षा; परीक्षेसाठी असणार ड्रेस कोड

By अविनाश कोळी | Published: May 04, 2024 7:00 PM

तीन तास अगोदर परीक्षा केंद्रांवर हजेरी

सांगली : वैद्यकीय शाखेच्या प्रवेशाकरिता संपूर्ण देशभरात उद्या, रविवारी ५ मे रोजी ‘नीट’ (युजी)ची परीक्षा होत आहे. यासाठी देशातील ५५७ व परदेशातली १४ केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा होत आहे. देशातील २४ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून यंदा २८ लाखांवर अर्ज दाखल झाले होते. अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळल्यानंतर व दुसऱ्यांना अर्जाची संधी दिल्यानंतर २४ लाखांवर विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.नीटसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या १० लाखांवर, तर मुलींची संख्या १४ लाखांच्या घरात आहे.देशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएसच्या १,०९,१४५ जागा असून, यावर्षी या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डेन्टलच्या २७ हजार जागा आहेत. एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीटच्या गुणांवरच होत असतात.

चौकटपरीक्षेपूर्वी तीन तास अगोदर हजेरीपरीक्षा दुपारी २ ला सुरू होणार असली, तरी परीक्षा केंद्रावरील रिपोर्टिंगची वेळ सकाळी ११ वाजताची आहे. दुपारी १:३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जातील. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेसाठी ड्रेस कोडपरीक्षेकरिता भडक रंगाचे कपडे, जास्त खिसे असलेले कपडे, फुल बाह्यांचा शर्ट, दागिने, हातात बांगड्या, कडा, गंडा, दोरा, धागे, पायात बूट या वस्तुंना प्रतिबंध आहे. फिकट रंगाचे कपडे, हाफ शर्ट, टी शर्ट, साधी चप्पल किंवा स्लिपर वापरायला परवानगी आहे.

पेन परीक्षा हॉलमध्ये दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी इतर कोणतेही साहित्य घेऊन जाऊ नये. मोबाइल, घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेऱ्यास मनाई आहे. पारदर्शक पाण्याची बाटली बाळगण्यास हरकत नाही. नीट परीक्षेच्या हजेरी पत्रकावर चिकटविण्यासाठी ॲडमीट कार्डवरील फोटोशी तंतोतंत जुळणारा पासपोर्ट आकाराचा फोटो बाळगावा. विद्यार्थ्यांनी तणाव न बाळगता परीक्षा द्यावी. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक, सांगली

टॅग्स :Sangliसांगली