सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 4.80 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 11.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 11.1 (651.3), जत - निरंक (306.4), खानापूर-विटा 5.2 (502.6), वाळवा-इस्लामपूर 7.5 (807.6), तासगाव - 3.6 (511.1), शिराळा 1.3 (1956.2), आटपाडी 1 (326.2), कवठेमहांकाळ 3 (422), पलूस 5.5 (539.1) व कडेगाव 6.6 (90.3.2).कोयना, वारणा, धोम, दुधगंगा, अलमट्टी ही धरणे 100 टक्के भरली असून कण्हेर व राधानगरी ही धरणे 99 टक्के भरली आहेत. कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेक्स, वारणा धरणातून 496 क्युसेक्स, तर अलमट्टी धरणातून 15 हजार 991 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
मिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:09 PM
सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 4.80 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 11.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देमिरज तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद कोयना, वारणा, धोम, दुधगंगा, अलमट्टी धरणे 100 टक्के भरली