गंगाराम पाटील वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या बफर झोन मधील मोठ्या क्षेत्राला वणव्याचा विळखा पडला असून व्याघ्र प्रकल्पाला मोठी झळ बसू शकते. वन्यजीव विभागामार्फत आग आटोक्यात आणण्यात येत होते. पण आगीचे लोट मोठे व झाडांचा अडथळा यामुळेच आग आटोक्यात आणणे जिकीरीचे बनत होते.
चांदोली व्याघ्र प्रकल्पा लगत असणाऱ्या मणदूर बफर झोन गावच्या मालकी डोगारास वनवा लागला होता तो हळू हळू सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये घुसल्याने वाघ्र प्रकल्पातील मोठ्या प्रमणात अनेक जीव जंतु वनस्पती नष्ट झाल्या आहेत आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की मोठ मोठी झाडे देखिल जळून खाक झाली आहेत वन्यजीव कडून आग विझावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. दाट झाडी खडा डोगर व वाळलेले गवत यामळे आग विझविण्यात अडथळे येत होते
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असणाऱ्या मालकी व वन्यजीव क्षेत्रास मोठ्या प्रमाणा आग लागली आहे. मणदूर येथील काही मालकी क्षेत्रांच्या डोंगरास तर काही वन्यजीवच्या हद्दी लगत असणाऱ्या क्षेत्रास मोठ्या प्रमाणात आग लागली. वन मजुरांचा आग विजविण्याचा केविलवान प्रयत्न सुरू होता. पण दाट झाडीमुळे आग विझविण्यास अडथळे येत होते.