शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मिरजेतील वॉन्लेस रुग्णालय वेल्लोरऐवजी कऱ्हाडला देण्याच्या हालचाली, कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध 

By संतोष भिसे | Published: October 31, 2023 4:48 PM

ख्रिस्ती मिशनरी सर विल्यम वाॅन्लेस यांनी १२५ वर्षांपूर्वी मिरजेत स्थापन केलेले रुग्णालय सध्या आर्थिक अडचणीत

मिरज : येथील दोन वर्षांपासून बंद असलेल्या वाॅन्लेस रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी निदर्शने केली. रुग्णालय वेल्लोरशिवाय अन्य खासगी वैद्यकीय महाविद्यालयास चालविण्यासाठी देण्यास विरोध केला.ख्रिस्ती मिशनरी सर विल्यम वाॅन्लेस यांनी १२५ वर्षांपूर्वी मिरजेत स्थापन केलेले रुग्णालय सध्या आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह सुमारे ४० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. गेली दोन वर्षे रुग्णालय बंद आहे. ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. ते मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बंद रुग्णालय वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज या ख्रिस्ती संस्थेस चालविण्यास देण्याबाबत बोलणी सुरू आहे. वेल्लोर येथील संस्थेच्या शिष्टमंडळाने मिरजेत येऊन पाहणीही केली आहे. हस्तांतराविषयी अनेक बैठकाही झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.यादरम्यान, अचानक वेल्लोरऐवजी कऱ्हाड येथील खासगी संस्थेला रुग्णालय चालविण्यास दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. वेल्लोरऐवजी इतर कोणत्याही संस्थेस देण्यास विरोध केला आहे. रुग्णालयाच्या आवारात एकत्र येत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. वेल्लोरशिवाय अन्य संस्थेकडे रुग्णालय सोपविण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सव्वाशे वर्षांची ख्रिस्ती संस्था स्थानिक राजकारण्यांच्या घशात घालण्यास विरोध असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटलmiraj-acमिरज