सांगली : टीईटी परीक्षेत भाषेचे धिंडवडे काढणाऱ्या परीक्षा परिषदेकडून आता गुणांची उधळण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रश्नपत्रिकेतील चुकांसंदर्भात चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. अहवाल समितीसमोर आल्यानंतर गुण देण्यासंदर्भात विचार करू, असे सुुतोवाच परिषदेचे आयुक्त तुकाराम तुपे यांनी केले आहे.
रविवारी (दि. १९ ) झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गोंधळामुळे परिषदेची पुरती नाचक्की झाली आहे. दीडशेहून अधिक चुकांचा पाऊस पाडत मराठीचे धिंडवडे परिषदेने काढले आहेत. साडेतीन लाख परीक्षार्थींमध्ये यामुळे तीव्र संताप आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठवली आहे. परीक्षा परिषदेचीच परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. शुद्ध मराठी लिहिता न येणाºया परिषदेने शिक्षकांची पात्रता तपासण्याचा अधिकार गमावल्याची टीका पवित्र शिक्षक संघर्ष समितीचे खजिनदार तुकाराम गलांडे यांनी केली आहे.
यापूर्वीची परीक्षा १५ जुलै २०१८ रोजी झाली होती, त्यावेळीही प्रश्नपत्रिकांत तब्बल १४० चुका आढळल्या होत्या. त्यानंतर तरी परिषदेचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा परीक्षार्थींना होती. पण चुकांची परंपरा परिषदेने यंदाही कायम ठेवली, किंबहुना गतवेळेपेक्षा दहा चुका जास्तच केल्या. राज्यात सध्या ६९ हजार टीईटी उत्तीर्ण उमेदवार नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. १९ जानेवारीरोजी आणखी ३ लाखांहून अधिकजणांनी परीक्षा दिली. सध्या बारा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरु असून अद्याप निम्म्मे शिक्षकही भरलेले नाहीत. त्यातच परिषदेने असा गोंधळात गोंधळ निर्माण केला आहे.
या संतापाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम सुपे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, यासंदर्भात विषयनिहाय तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. संगणकावर टायपिंग करताना चुका झाल्या, की छपाईवेळी दोष राहिले हे स्पष्ट होईल. त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. अहवाल समितीसमोर ठेवू, त्यानंतर चुकीच्या प्रश्नांचे गुण देण्यासंदर्भात निर्णय घेऊ. दोषींवर दंडात्मक कारवाईदेखील करणार आहोत. परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनीही कारवाईचे संकेत दिलेत.
मराठी भाषेचे धिंडवडे काढल्यानंतर आता परीक्षा परिषद उमेदवारांच्या नोकºयांच्या संंधीचा खेळखंडोबा करत आहे. सरसकट गुण देण्याने प्रामाणिक व हुशार उमेदवारांवर अन्याय होणार आहे. बºयाच वर्षांनी मिळत असलेल्या नोकºया गमावण्याची भीती आहे.- तुकाराम गलांडे, खजिनदार, पवित्र शिक्षक संघर्ष समिती-----