शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सांगलीत पोलिसांचे संचलन

By admin | Published: October 12, 2014 12:50 AM

निवडणुकीची तयारी : जिल्ह्यात २४ तास नाकाबंदी

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे तीन दिवस राहिल्याने पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातून संचलन केले. येत्या एक-दोन दिवसात बंदोबस्ताचे वाटप केले जाणार आहे. शुक्रवारपासून जिल्ह्याभर २४ तास नाकाबंदी लावण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी १५ आॅक्टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ३८८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचा आढावा घेतला. जिल्ह्यातील पोलिसांची कुमक कमी असल्याने बाहेरील राज्यातून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनीच शहरातून संचलन केले. पुष्पराज चौकातून संचलनास सुरुवात झाली. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, धनंजय भांगे, राजू मोरे यांच्यासह चारशेहून अधिक पोलीस संचलनात सहभागी झाले होते. ढोल वाजवित संचलन करण्यात आले. राममंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर, स्टेशन चौक, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक, आंबेडकर रोड या प्रमुख मार्गावरुन संचलन झाले. जिल्हाभर उद्या (रविवार) पासून संचलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)