शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

खासदारसाहेब, सत्तेचा माज बाळगू नका!

By admin | Published: February 19, 2017 11:49 PM

धनंजय मुंडे : सरकारची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी

तासगाव : सत्ता असल्यामुळे भाजपचे खासदार अंगात आल्यासारखे वागत आहेत. मात्र खासदारसाहेब, सत्तेचा माज बाळगू नका. शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत. राज्यातल्या सरकारची अवस्था ‘आयसीयू’मधील रुग्णासारखी आहे, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार संजयकाका पाटील यांना रविवारी लगावला. तासगाव तालुक्यातील सावळज आणि विसापूर येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंडे यांची सभा झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, सुरेश पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.मुंडे म्हणाले की, आबांच्या जाण्याने जेवढे त्यांच्या कुटुंबाचे नुकसान झाले, तितकेच नुकसान राज्याचे व आमचेही झाले. मला विरोधी पक्षनेता करण्यामागे आबांचे मोठे योगदान होते. त्यांच्या विचारांचा वारसा कायम ठेवणार आहे. सत्तेच्या जिवावर खासदार उड्या मारायला लागले आहेत. पण शिवसेनेने पाठिंंबा काढून घेतला, तर उद्या तुमची गाठ आमच्याशी आहे. मौका सभी को मिलता है.ते म्हणाले की, आम्ही सत्तेत नसलो तरी, आमच्या मनगटात ताकद आहे. सत्ताधाऱ्यांना वाकवून या भागाला पाणी मिळवून देण्याचे काम मी करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेली हड्डी असल्याचे स्वत:च सांगितले होते. नोटाबंदीनंतर नेमका काय फायदा झाला, हे सांगण्यास कोणीही तयार नाही. शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १६ तारखेला जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दुसऱ्यादिवशी आयोगाने जाहीर केला असता, तर राज्यात राष्ट्रवादी पक्ष एक नंबरवर दिसला असता. शेतकऱ्यांच्या मनातील सरकार विरुध्दचा राग २१ तारखेला मतदानातून बाहेर पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी असल्याचे सांगतात. त्यांनी दुभत्या गाईची धार काढून दाखवावी. मार्चमधील उन्हाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर सरकारला सळो की पळो करुन सोडू. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्याची घोषणा करणाऱ्या भाजपवाल्यांनी १२२ कॅबिनेट झाल्या तरी अजूनही आरक्षणाचे नावही काढले नाही. सावळज येथील सभेस जिल्हा परिषदेचे उमेदवार चंद्रकांत पाटील, सावळज गणाच्या उमेदवार मनीषा माळी, वायफळे गणाच्या उमेदवार शुभांगी पाटील, विसापूर गटाचे उमेदवार अर्जुन पाटील, विसापूर गणाचे उमेदवार दादासाहेब जाधव, बोरगाव गणाचे उमेदवार संभाजी पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)अशा आमदाराला जोड्याने मारले पाहिजे सोलापूरचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत मुंडे म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नीबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदाराला जोड्याने मारायला हवे. भाजप देशभक्त असेल, तर या आमदाराला निलंबित करावे.