शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 4:57 PM

'भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे'

तासगाव : सांगलीलोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील हे हॅटट्रिक करणार हे निश्चित आहेच; पण तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातही कमळ फुलणार आहे. येथे प्रभाकर पाटील हेच पुढचे आमदार असतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकारी, नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच संजय गांधी योजनेचे अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, दीपक शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे. आपल्या राष्ट्राची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्याचे काम २०१४ ला सुरू झाले. आज संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या देशातील विकसित शहरांकडे व योजनांकडे आहे.संजय पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी. या कामात पदाधिकारी लागेल ती मदत करतील अशा सूचना केल्या.प्रभाकर पाटील म्हणाले, मतदारसंघातील सर्वांगीण विकासाबरोबर उद्योग व्यवसाय, दळण वळण, पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. आपण सर्वजण भाजपाचा विचार घेऊन काम करत आहात याचा अभिमान आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा