शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 7:16 PM

लोकसभेचा पैरा फेडताना होणार कसरत

दत्ता पाटीलतासगाव : लोकसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात असूनही सर्वपक्षीय नेत्यांनी पाठबळ देऊन विशाल पाटील यांना लोकसभेत पाठवले. मात्र, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेला केलेला पैरा फेडावा, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. बहुतांश मतदारसंघात अनेक इच्छुक आणि सर्वच इच्छुक लोकसभेला खासदार पाटील यांच्यासोबत असणारेच आहेत. त्यामुळे विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर विशाल पाटील धर्मसंकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून ते बाहेर कसे पडणार? याचे औत्सुक्य आहे.लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा राहून निवडून येण्याची किमया विशाल पाटील यांनी साधली. विशाल पाटील यांना विजयापर्यंत नेण्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही रसद पुरवली. त्यामुळेच मतदारसंघातील वारे फिरले आणि विशाल पाटील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली.लोकसभेला विशाल पाटलांच्या विजयामुळे त्यांना पाठबळ देणाऱ्या सर्वच नेत्यांचा विधानसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास उंचावला आहे. यापैकी बहुतांश नेत्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पलूस-कडेगावचा अपवाद सोडल्यास, अन्य पाच विधानसभा मतदारसंघांत विशाल पाटील यांच्यासमाेर धर्मसंकट निर्माण झाले आहे.

सर्वच इच्छुकांनी खासदारांकडे पैरा फेडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आताच्या विधानसभेत घेतलेला निर्णय दुरगामी ठरणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे अद्याप तरी विशाल पाटील यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच आहे. मात्र, येणाऱ्या काळात ते कोणाचा पैरा फेडणार आणि या धर्म संकटातून कसे बाहेर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

खासदारांसमोरील धर्मसंकटसांगली विधानसभा - होम ग्राउंड असलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील दोघेही इच्छुक आहेत. विधानसभा उमेदवारीवरून दोन्ही इच्छुकांत संघर्ष सुरू आहे. धर्म संकटाची सुरुवात होम ग्राउंडवरच झाली आहे.

मिरज विधानसभा - गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे होता. हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी विशाल पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोणाच्या तराजूत वजन टाकायचे, हे ठरवतानाच त्यांची कसरत होणार आहे.

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा - या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आता माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही रणशिंग फुंकले आहे. या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांना रसद दिली होती.

खानापूर - आटपाडी विधानसभा - या मतदारसंघात विशाल पाटील यांना शिवसेना शिंदे गटाची काही ठिकाणी छुपे सहकार्य, तर तानाजीराव पाटील यांचे उघड पाठबळ मिळाले होते. येथे शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर रिंगणात आहेत. मात्र, विशाल पाटील महाआघाडीत, तर बाबर महायुतीत असल्यामुळे धर्मसंकट निर्माण होणार आहे.

जत विधानसभा - या मतदारसंघात विशाल पाटील यांचा कौल काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या बाजूनेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत विशाल पाटील यांची खिंड लढवणारे विलासराव जगताप विधानसभेला सावंत यांच्या विरोधात उतरले, तर मात्र खासदार पाटील यांची कसरत होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस