संतोष भिसे सांगली : नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती आहे, तरीही तीन हजार अर्ज येऊन पडलेत.नोकरीऐवजी व्यवसाय-धंद्याचा सदुपदेश कितीही कानीकपाळी केला तरी, तरुणाईच्या पचनी पडण्याची चिन्हे नाहीत. अवघ्या सात हजारांत राबून नोकरीच्या रुबाबासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. नोकरीसाठी काहीही करायला तयार असल्याचे या नोकर भरतीवरुन दिसले आहे.सफाई कामगारांच्या १६५ जागा भरायच्या आहेत. शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण व वयोमर्यादा १८ ते ४० आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यानची मुदत होती. या अवघ्या आठवडाभरात तब्बल २ हजार ९०० तरुणांनी अर्ज केले. त्यापैकी सहाशेहून अधिक बारावीपेक्षा जास्त शिकलेले आहेत. त्यातील दोनशेजण बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. पदवीधर आहेत. सुमारे वीसभर तरुणांनी एम. कॉम., एम. एस्सी.च्या पदव्या मिळवल्यात.एकूणच या भरती प्रक्रियेने बेरोजगारीची व्याप्ती आणि तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. दरम्यान, महापालिकेतील बदली कामगारांनी नव्या भरती प्रक्रियेविरोधात कामगार न्यायालयात धाव घेतल्याने ती रखडली आहे.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं
एम.एस्सी. पदवीधर तरुण करणार शहरांची साफसफाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:48 PM
नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती आहे, तरीही तीन हजार अर्ज येऊन पडलेत.
ठळक मुद्देएम.एस्सी. पदवीधर तरुण करणार शहरांची साफसफाई!सहा महिन्यांसाठी नियुक्ती, तरीही तीन हजार अर्ज