लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळव्यातील कोटभाग येथील महात्मा फुले नगरमधील अनेक पथदिवे दीड महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नागरिकांनी पाठपुरावा केला असता ‘आमच्याकडे विजेच्या खांबावर चढणारा माणूस नाही. तुम्ही माणूस बघा, आम्ही दिवे बदलताना वीज बंद करून सहकार्य करताे,’ असा अजब सल्ला महावितरण कार्यालयाकडून देण्यात आला. अखेर ग्रामपंचायत सदस्या सुरेखा कांबळे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदेश कांबळे यांनी खांबावर चढून दिवे बदलले.
वाळव्यातील महात्मा फुलेनगरमध्ये पथदिवे बंद असल्याने गैरसाेय हाेत हाेती. ग्रामस्थांनी बल्ब बसविण्यासाठी ग्रामपंचायतला कळविले. ग्रामपंचायतने महावितरण कार्यालयात पाठपुरावा केला असता ‘आमच्याकडे विजेच्या खांबावर चढणारा माणूस नाही, तो तुम्हीं आणा आम्ही वीज बंद करून सहकार्य करतो’ असे उतर देण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लाॅकडाऊन यामुळे ग्रामस्थांचाही नाइलाज झाला. अखेर ग्रामपंचायत सदस्या सुमन कांबळे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदेश कांबळे यांनी स्वत: विजेच्या खांबावर चढून बल्ब घालण्याचे ठरविले.
कोटभाग येथील महावितरणचे कर्मचारी रहिम शेख यांना महावितरण कंपनीने नेमले आहे, पण त्यांना विजेच्या खांबावर चढता येत नाही. त्यांना वीज बंद करण्याची विनंती केली आणि संदेश कांबळेंनी स्वत: विजेच्या खांबावर चढून बल्ब बदलले. यासाठी त्यांना लव शेळके, शुभम शेळके, प्रथमेश शेळके यांनी मदत केली.
फाेटाे : ०५ वाळवा २