शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
2
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
3
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
4
पाकिस्तानची मनमानी चालणार नाही, खेळायचं असेल तर भारतात यावंच लागेल! BCCIने दिला दणका
5
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
6
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
7
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
8
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
9
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
10
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
11
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
12
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
13
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
14
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
15
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
16
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
17
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
18
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
19
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
20
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी

Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 12:45 PM

शिगाव, खोची, कवठेपिरान गावांचे आरोग्य धोक्यात

दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथे वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. नदीचीपाणीपातळी वाढताच मळीमिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालेले आहे. नदीकाठावर सर्वत्र फेस जमा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मळीमिश्रीत पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत. दूषित पाण्यामुळे शिगाव, खोची, दूधगाव, कवठेपिरान, आदी अनेक गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी वारणा नदीला पहिले पाणी आले की, मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. शनिवारी पुन्हा पाणी सोडल्याने दुधगावजवळ मृत माशांचा खच पडल्याचे निदर्शनास आले. यामुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा गांभीर्याने पुढे आला आहे. पाणी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

दूषित पाण्याने मगरीचाही मृत्यूवारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिलाचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी मगरीचा मृतदेह नदीतून वाहत आल्याचे ग्रामस्थांना आढळले. त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. मात्र, सायंकाळपर्यंत मृत मगर नदीपात्रातच तरंगत होती. पाण्याला काळा रंग आला असून दुर्गंधीही पसरलेली आहे.

वारणेला दूषित पाणी आले असतानाही ग्रामपंचायत काहीही कार्यवाही करत नाही. गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मळीमिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्यांवर मोर्चा काढावा. मळीमिश्रित पाणी पुन्हा नदीपात्रात सोडले जाऊच नये, यासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे. - संदीप पाटील, ग्रामस्थ 

नदीचे पाणी दूषित झाल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी शिल्लक पाणी पुरवून वापरावे. तसेच ते उकळून व शुद्ध करून प्यावे. - गिरीश पाटील, प्रभारी सरपंच, दुधगाव

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीpollutionप्रदूषण